सातारा जिल्ह्यातील हॉटेल रेस्टारंट, धाबे रात्री 11 नंतर बंद
सातारा -: सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातीत हॉटेल, रेस्टॉरंट व धाबे इ. क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार रात्रीचे 11 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशामधून राष्ट्रीय महामार्गावर असणारे हॉटेल, रेस्टॉरंट धाबे यांना वगळण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट धाबे इ. 7 दिवस बंद करुन त्यांचे विरुध्द दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
No comments