फलटण वकील संघ कार्यालयात कै. ॲड. दिपक गाडे स्मृती ग्रंथालयाचे उदघाटन
![]() |
फलटण वकील संघ कार्यालयात कै. ॲड. दीपक गाडे ग्रंथालयाचे उदघाटन करताना ॲड. उदयसिंह पाटणकर व अन्य मान्यवर |
Inauguration of Late Adv. Deepak Gade Memorial Library at Phaltan Advocates Association Office
फलटण - : कै. ॲड. दिपक गाडे यांच्या स्मरणार्थ कै. ॲड. दिपक गाडे यांच्या संग्रहात असणारी वकिलीची पुस्तके फलटण वकील संघास देण्यात आली, त्या कायद्याच्या पुस्तकांमध्ये वकिली व्यवसायासाठी अत्यंत उपयोगी आणि गरजेची अशी पुस्तके असून, सदर पुस्तकांचे वेगळे ग्रंथालय फलटण वकील संघ कार्यालयात उभारले आहे, सदर कायद्याच्या पुस्तकांमुळे नवीन, तरुण, होतकरु वकिलांना त्याचा नक्कीच लाभ तर होणार आहेच परंतू त्यामुळे कै. ॲड. दीपक गाडे यांच्या आत्म्यास नक्कीच शांती लाभेल असा विश्वास फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी व्यक्त केला आहे.
फलटण वकील संघामध्ये "कै. ॲड. दिपक गाडे स्मृती ग्रंथालयाचे" उदघाटन प्रसंगी कै. ॲड. दिपक गाडे यांचे स्नेही सातारा वकील संघातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उदयसिंह पाटणकर काका, सातारा जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. अमर भोसले, ॲड. अनिल देशमुख, ॲड. संदिप गायकवाड, फलटण वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. राहुल बोराटे, सचिव ॲड. रणजीत भोसले आणि इतर सभासद उपस्थित होते. अध्यक्षस्थानी फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे होते,
सदर पुस्तकांचा सदुपयोग होत असलेने खऱ्या अर्थाने कै. दिपक गाडे यांना हीच एक श्रद्धांजली ठरणार असल्याचे मत ॲड. राहुल कर्णे यांनी व्यक्त केले.
मुळचे मौजे तरडगाव, ता. फलटण येथील रहिवाशी असणारे, ग्रामीण व शेतकरी कुटुंबात वाढून विधी क्षेत्राचा अभ्यास पूर्ण करुन वकिलीची सनद मिळवून अत्यंत कमी कालावधीत वकिली व्यवसायात नाव लौकीक मिळविलेले, सातारा जिल्हा वकील संघाचे अध्यक्षपद भूषविलेले रुबाबदार व्यक्तिमत्व कै. ॲड. दिपक गाडे, यांचे दि.१७ सप्टेंबर २०१७ रोजी अपघाती निधन झाले, त्यांनी वकील व्यवसाय करताना कष्टातून उभारलेली स्वतःची कायद्याच्या पुस्तकांची लायब्ररी आहे. ज्यामध्ये विविध कायद्यांची पुस्तके आहेत. सदर कायद्याच्या पुस्तकांचा आपले पतीचे पश्चात नवीन, तरुण व होतकरु वकिलांना फायदा व्हावा आणि त्याचा सदुपयोग व्हावा असा ध्यास व मानस मनाशी बाळगून कै. ॲड. दिपक गाडे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती उमा दिपक गाडे यांनी सदर कायद्याची पुस्तके व लायब्ररी ही फलटण वकील संघास आपले पतीचे स्मरणार्थ भेट देवून ती फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांचेकडे सुपूर्द केली.
उदघाटन समारंभात कै. ॲड. दिपक गाडे यांच्या आठवणींना उजाळा देत ॲड. पाटणकर काका, ॲड. अमर भोसले, फलटण वकील संघाचे सदस्य ॲड. नामदेव शिंदे, ॲड. बजरंग जाधव यांनी ॲड. दीपक गाडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
No comments