Breaking News

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर वेबिनार

Webinar on 'Consumer Protection Act 2019 New Look' today on the occasion of National Consumer Day

        मुंबई - : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र, मुंबई यांच्यामार्फत दि. २४ डिसेंबर २०२० रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिनाचे’  औचित्य  साधुन ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

        या वेबिनारमध्ये ‘नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९’ बाबत निमंत्रित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हे वेबिनार युट्यूबवरूनही प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत https://www.youtube.com/watch?v=ts5DOlwQv_M&feature=youtu.be

        या लिंकचा वापर करावा.  अधिकाधिक नागरिकांनी, ग्राहकांनी  या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत करण्यात आले आहे.

No comments