Breaking News

अंदमान समुद्रात एसआयटीएमईएक्स-20 त्रिपक्षीय सागरी कवायती

Trilateral Maritime Exercise SITMEX-20 In Andaman Sea

        स्वदेशी बनावटीची  एएसडब्ल्यू कॉर्वेट कामोर्ता आणि  कॉर्वेट करमुक क्षेपणास्त्र यांच्यासह भारतीय नौदलाची जहाजे अंदमान समुद्रात 21 ते 22 नोव्हेंबर 20 या कालावधीत होत असलेल्या एसआयटीएमईएक्स -20 या  भारत, सिंगापूर आणि थायलंड  त्रिपक्षीय सागरी कवायतीत भाग घेत आहेत.

        भारतीय नौदलाने यजमानपद भूषवलेली पहिली एसआयटीएमईएक्स कवायत  सप्टेंबर 2019 मध्ये पोर्ट ब्लेअर जवळ आयोजित करण्यात आली होती. भारतीय नौदल , सिंगापुर नौदल  आणि थाई नौदल  यांच्यात परस्पर आंतर-परिचालन क्षमता वाढवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी  एसआयटीएमईएक्स कवायतीचे आयोजन केले जाते.   2020 ची ही कवायत सिंगापूर नौदल आयोजित करत आहे.

        कोविड 19 महामारी  लक्षात घेऊन ही कवायत  ‘विना स्पर्श , केवळ समुद्रात ’ होत असून  तीन मैत्रीपूर्ण नौदले आणि सागरी शेजार्‍यांमधील समुद्री क्षेत्रात वाढता  समन्वय आणि सहकार्य अधोरेखित करते. दोन दिवसांच्या या सागरी कवायतीत तिन्ही नौदले  नौदलातील डावपेच ,  पृष्ठभागावरील  युद्ध सराव आणि शस्त्रास्त्र गोळीबारासह  विविध सरावांमध्ये सहभागी होतील.

No comments