सुश्मिता सेन साजरा करतेय 45 वा बर्थडे
गंधवार्ता वृत्तसेवा - बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आज 19 नोव्हेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबाद येथे जन्मलेल्या सुष्मिताचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. सुश्मिता सेनची आई दुबईतील एका स्टोअरमध्ये ज्वेलरी डिझायनर होती. सुष्मिताने अभिनय, मॉडेलिंग क्षेत्रा नाव कमावले असतानाच तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याकडेही, लक्ष दिले आहे. तिने दोन मुलींना दत्तक घेऊन सिंगल पेरेंट्स संकल्पना सत्यात आणली. सुश्मिताने 2000 मध्ये रिन्नी आणि 2010 मध्ये अलिशा या दोघींना दत्तक घेतले होते.
वाढदिवसाला सकाळी आई, आलिशा व रिन्नी (मुली) यांनी सरप्राईज बर्थडे विश केले. त्याचे फोटो सुश्मिता सेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
No comments