Breaking News

सातारा जिल्ह्यात 63 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1552 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

63 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 19 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 863 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1552 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 1552  जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54, कराड येथील 70, फलटण येथील 163, कोरेगांव येथील 203, वाई येथील 106, खंडाळा येथील 159, रायगांव येथील 84, पानमळेवाडी येथील 198, मायणी येथील 83, महाबळेश्वर येथील 110, पाटण येथील 28,  दहिवडी येथील 50,  खावली येथील 89,  म्हसवड येथील 60, पिंपोडा 36 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 1552 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने - 224033

एकूण बाधित -49297  

घरी सोडण्यात आलेले - 46654  

मृत्यू - 1659

उपचारार्थ रुग्ण- 984

No comments