Breaking News

सुरवडी येथील जमिनींना रस्ता उपल्ब्ध करून दयावा - शिवसेना

Roads should be provided to the lands at Survadi - Phaltan Taluka Shivsena

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे सुरवडी तालुका फलटण येथून वाहणाऱ्या नीरा उजवा कॅनॉल लागतच्या जमिनींना वर्षानुवर्षे रस्ते नसल्यामुळे, त्या पडीक ठेवाव्या लागत आहेत, तरी या जमिनीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

    फलटण तालुका शिवसेना यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सुरवडी येथील शेतकऱ्यांच्या आलेल्या मागणीनुसार येथील शेतक-यांच्या जमिनीतून कॅनॉल गेलेला आहे. परंतु वर्षानुवर्षे या कॅनॉल लगतच्या (गट नं. ४९२, ४९४, ४९५, ४९८ आदी) शेतक-्यांना रस्त्याअभावी जमिनी पडून ठेवाव्या लागत आहेत भरपूर नुकसान होत आहे. बेरोजगारीची समस्या असल्यामुळे शेतीकडे वळणे भाग पडत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देऊन त्यांचेवरील अन्याय दूर करावा अशी आपणास नम्रपूर्वक विनंती.

        सद्यस्थितीला त्याठिकाणी मोरी (कॅनॉल) सिमेंट  काँक्रीटीकरण काम चालु आहे. त्यासाठी कॅनॉलच्या भरावावरुन रस्ता काढण्यात आलेला आहे. सदर रस्ता जरी शेतकऱ्यांना वापरासाठी तसाच ठेवण्यात आला, तरी त्यांची समस्या विनाखर्च व वेळेचा विलंब न होता निकालात निघु शकते, वरील पर्याय शक्य नसल्यास संबंधित विभागास तात्काळ सदर समस्येचे निवारण करण्यास संबंधीत विभागास आदेश देण्यात यावे. 

No comments