Breaking News

सातारा जिल्ह्यात 167 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 548 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

167 corona patients discharged today in Satara district
        सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 167 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 548 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 548  जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, कराड येथील 11, फलटण येथील 50, कोरेगांव येथील 32, वाई येथील 100, खंडाळा येथील 102, रायगांव येथील 31, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 13, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 7,  दहिवडी येथील 65,  तळमावले येथील 6, म्हसवड येथील 17, पिंपोडा येथील 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 548 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने - 225674

*एकूण बाधित -49404  

*घरी सोडण्यात आलेले - 46821  

*मृत्यू - 1670 

*उपचारार्थ रुग्ण- 913

No comments