फलटण तालुक्यात आजसुद्धा 13 कोरोना पॉझिटिव्ह
Corona virus phaltan updates : 13 corona positive
फलटण दि. 15 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 15 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 13 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 1 व्यक्ती तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. दरम्यान जिल्ह्याचा आकडा 100 च्या आत आला असून, आज जिल्ह्यात 96 व्यक्तींच्या करुणा चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.
फलटण शहरात लक्ष्मीनगर 1 व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ग्रामीण भागात 12 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये शेरेचीवाडी 2, सुरवडी 3, साखरवाडी 1, खामगांव 3, होळ 1, अब्दागिरेवाडी 1, उगाळेवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
No comments