दोन मुलांनी दारूच्या नशेत केला वडिलांचा खून
Two children killed their father under the influence of alcohol
गंधवार्ता वृत्तसेवा (दि.20 ऑक्टोबर 2020) - मलटण, फलटण येथे देशपांडे बंधूंनी आपल्या पित्याचा विट डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली आहे. पोलीस तपास करीत असून, रात्री 2 वाजता वडील मुलांची भांडणे सोडवत होते, 3 वाजता आईने उठून पाहिले तर वडील जखमी अवस्थेत खाली पडले होते व दोन्ही मुले टीव्ही लावून दंगा करत असल्याचे आईला दिसून आले. पहाटे जखमी वडिलांना रुग्णालयात नेले परंतु त्यापूर्वीच वडील मयत झाले होते.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान, सगुनामाता नगर मलटण, फलटण येथे फिर्यादी नंदा बाळू देशपांडे यांच्या घरात, मुलगा तेजस उर्फ सोन्या व शिवतेज यांनी दारूच्या नशेत फिर्यादी नंदा यांचे पती म्हणजे त्या मुलांचे वडील बाळू देशपांडे यांना कोणत्या तरी कारणावरून, वीट व इतर हत्याराने मारहाण करून त्यांचा खून केला असल्याची फिर्याद मुलांच्या आई नंदा यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बनकर हे करीत आहे.
दोन्ही मुलांनी दारुच्या नशेमध्ये सदरचे कृत्य केल्याचे दिसुन येत आहे. वडील त्यांची भांडणे सोडवत होते. रात्री २.०० नंतर वडील व मुले एकत्र झोपली होती. व आई त्याच घरात आतील बाजुला झोपले होती. पहाटे ३.०० वाजता आवाज आल्यानंतर आई उठली त्यावेळी दोघे मुले टीव्ही लावुन दंगा करत होती. व वडील खाली जखमी अवस्थेत पडले होते. एक कान पूर्ण चेचला होता व त्याठिकाणाहून रक्त येत होते. बाळू देशपांडे यास पहाटे लाइफलाइन हाॅस्पीटल येथे नेले असता, डाॅक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषीत केले. मयत बाळू देशपांडे यांच्या पत्नी यांनी त्यांच्या मुलांच्या विरुध्द मारहाण करुन खून केल्याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्याकडे दिली असून तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले आहे.
No comments