Breaking News

पाडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुप्रिया निलेश ताम्हाणे

सौ. सुप्रिया निलेश ताम्हाणे यांचे अभिनंदन करताना आ. दीपक चव्हाण 

         तरडगाव (प्रतिनिधी)  - पाडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुप्रिया निलेश ताम्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाडेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. स्मिता राजेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री बळीप एम.बी. यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सौ. सुप्रिया निलेश ताम्हाणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. 

        पाडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  सौ.सुप्रीया ताम्हाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सौ. रेखाताई खरात (पाटील)उपसभापती फलटण पं.स.यांनी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन केले . पाडेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक  स्वागत करण्यात आले.  निवडणूक ग्रा. पं. कर्मचारी श्री.प्रभाकर नेवासे यांनी सहकार्य केले. 

No comments