Increase in organic farming production due to KB Bio-Organics technology
फलटण दि. 1 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - के.बी. बायो- ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानामुळे सेंद्रिय शेती उत्पादनात वाढ झाली असून शेतकऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. पूर्वी सेंद्रिय शेती करताना ज्या अडचणी शेतकऱ्यांसमोर येत होत्या, त्याच्यावर के बी एक्सपोर्ट यांनी यशस्वी मात केली आहे. के.बी.बायो- ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानामुळे सेंद्रिय शेती व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवाचा मार्ग सुकर झाला असून उत्पादन देखील वाढले असल्याची माहिती संचालक सचिन यादव यांनी दिली.
 |
के. बी. एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव |
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व तोट्यात येणारी शेती यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत जात असताना, त्याला स्वता:च्या कुटुंबियांसाठी व भारतवासीयांसाठी सेंद्रिय शेतमाल मिळवून देणे, हे एक आव्हान बनले आहे. या आव्हानांना सामोरे जाताना व रेसिङ्यू-फ्री शेतमालाचे उत्पादन घेणे हे शेतकऱ्यांसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. पिकांवरील रोग व किडींचे नियंत्रण करणे. आजपर्यंत भेसळमुक्त सेंद्रिय औषधे मिळणे हे शेतकऱ्यांना जिकिरीचे होते आणि जोपर्यंत कीड व रोग नियंत्रण होत नाही तोपर्यंत फायदेशीर शेतीचा विचार शेतकरी करू शकत नव्हता.
के. बी. एक्सपोर्टस कंपनीच्या माध्यमातून गेल्या १५ ते २० वर्षांपासून करार पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांची ही गरज ओळखून ५ वर्षांपूर्वी के. बी. एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी संशोधन व विकास विभाग स्थापन करून बोटॅनिकल आधारित अल्कोलाईड बेस सेंद्रिय उत्पादने प्रत्येक किडीसाठी व रोगांसाठी निर्माण केली आहेत. ही सर्व उत्पादने रासायनिक औषधांच्या तोडीस तोड, ४८ तासात तात्काळ सर्व प्रकारच्या किडी व रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण करणारी आणि कोणतेही केमिकल भेसळ नसणारी, अपेडा मान्यताप्राप्त इकोसर्ट' संस्थेकडून सेंद्रिय शेती मान्यताप्राप्त असलेली, पेटंट' सुरक्षित तसेच निमवर आधारित उत्पादने सीआयबी' रजिस्टर आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या प्रमाणे भारत देशाने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात प्रदार्पण केले होते त्याच दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२० पासून के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीने आपली सर्व उत्पादने वितरीत करून रासायनिक औषधांच्या पारतंत्र्यातून शेतकऱ्यांना मुक्ती दिली आहे. गेल्या ५ वर्षांपासून या औषधांवर संशोधन केलेले असून, कंपनीने शेतकऱ्यांच्या करार शेतीमध्ये याची फवारणी करून कीड व रोगांचे उत्तम नियंत्रण करून निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन तो माल युरोपमध्ये निर्यात केला असल्याची माहिती कंपनी प्रतिनिधी यांनी दिली. तसेच थ्रीप्स व डाऊनी मिलड्यु साठी भारतात सर्वोत्कृष्ट औषध असल्याचे शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे.
No comments