Breaking News

एस.पी. तेजस्वी सातपुते यांना निरोप तर नूतन एस.पी. अजयकुमार बन्सल स्वागत

 

        सातारा - : मावळत्या एस.पी. तेजस्वी सातपुते यांना  निरोप देऊन सातार्‍याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.  सातारा  पोलीस परेड ग्राऊंड येथे  झालेल्या सोहळ्यात  एस.पी. तेजस्वी  सातपुते यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांचे  कौतुक व अभिनंदन करण्यात आले. 
        कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस संचालक मनोजकुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस परेड ग्राऊंड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून सातपुते यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या.
        या सोहळ्यात एस.पी. तेजस्वी  सातपुते यांच्या बरोबर केलेल्या कामाच्या आठवणी अनेक पोलीस अधिकार्‍यांनी सांगितल्या.  यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशाची मूर्ती भेट म्हणून देवून सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे दाखल झाले. आयजी मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन रुजू झालेल्या सातारा, कोरेगाव, वाई विभागाच्या नूतन उपअधीक्षक यांचेही स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानंतर नूतन एस.पी. अजय कुमार बन्सल यांनी पोलीस मुख्यालयातील जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात जाऊन आपल्या पदाचा चार्ज घेतला. मावळत्या एस.पी. तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चार्ज दिल्यानंतर त्या सोलापूरकडे रवाना झाल्या.

No comments