दिलीपसिंह भोसले खऱ्या अर्थाने ‘द हिरो’ ठरले
फलटण (ॲड.रोहित अहिवळे) - दि.१७ नोव्हेंबर २०२५ - फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीची चुरस रंगतदार बनली असतानाच, भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीपसिंह भोसले यांनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे निवडणूक वातावरणात मोठी कलाटणी मिळाली आहे. पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी आज, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली असून, या निर्णयामुळे ते या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले दिलीपसिंह भोसले यांनी भाजपात प्रवेश घेतानाच त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर फलटणचे नगराध्यक्ष पद खुले झाल्यानंतर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनीही भोसले हेच उमेदवार असतील, असे जाहीर केले होते.
दरम्यान, तब्बल 25 वर्षे नगरपरिषदेत प्रभावी विरोधी भूमिका निभावत आलेले व सत्ताधाऱ्यांवर आपल्या विरोधी पक्षनेत्याच्या अस्त्राने अंकुश ठेवणारे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची मागणी जनतेकडून वाढू लागली. या पार्श्वभूमीवर पक्षातील मतैक्य जपण्यासाठी घेतलेला दिलीपसिंह भोसले यांचा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेत संघर्षमय परिस्थिती शांत करत पक्षात एकजूट निर्माण करणारा हा निर्णय दिलीपसिंह भोसले यांना खऱ्या अर्थाने ‘द हिरो’ बनवणारा ठरला आहे.

No comments