विजयराव बोरावके यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ नोव्हेंबर २०२५ - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव कोंडीराम बोरावके (वय 83) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असलेल्या बोरावके यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेते म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांचा सन्मानाने गौरव केला जात असे. पक्ष संघटन मजबूत करण्यापासून कृषी क्षेत्रातील उपक्रमांपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेकांना लाभ झाला.
विजयराव बोरावके यांच्या पार्थिवावर फलटण येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

No comments