नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह व श्रीमंत अनिकेतराजे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ नोव्हेंबर २०२५ - नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस गजबजलेला राहिला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तर शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केले.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याचा समृद्ध अनुभव असून नगरपरिषदेतील कार्यपद्धती, शहर विकास याबाबत त्यांचे भक्कम मत व धोरण राहिले आहे.
तर दुसरीकडे, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे देखील माजी नगरसेवक असून त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना वेग देत नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला होता.
दोन्ही उमेदवारांनी आपली ताकद दाखवत समर्थकांसह अर्ज दाखल केला असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

No comments