श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ.नीलम लोंढे-पाटील यांच्याकडून साड्या, मास्क, वाफ घेण्याचे मशीनचे वाटप
![]() |
साड्यांचे वाटपा करताना सौ.नीलम लोंढे-पाटील व इतर |
फलटण - महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहरातील व ग्रामीण भागातील गरजू ,गरीब ,बेघर महिलांना फलटण लायनेस क्लबच्या अध्यक्षा व वेदांत कलेक्शन च्या संचालिका सौ.नीलम लोंढे-पाटील यांच्या वतीने सुमारे 150 साड्या, 200 N-95 मास्क,75 वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विजयकुमार लोंढे पाटील व नीलम लोंढे पाटील हे दांपत्य नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतात. त्यांच्या आजच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे .त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
![]() |
साड्यांचे वाटपा करताना मान्यवर |
वेदांत कलेक्शन, महात्मा फुले चौक येथे साड्या, मास्क व वाफ घेण्याचे मशीन आदी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सौ.वैशाली चोरमले, श्री.भाऊ कापसे, श्री.दादासाहेब चोरमले ,लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला.उज्वला निंबाळकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रमोद जगताप, लायन्स हॉस्पिटलचे अध्यक्ष ला.अर्जुनराव घाडगे, मुधोजी क्लबचे सचिव श्री.राजीव ना.निंबाळकर, विंचुर्णीचे सरपंच श्री.रणजितभाऊ निंबाळकर, यादव रावसाहेब, नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती ला. विजयराव लोंढे पाटील ,लायन्स क्लबच्या खजिनदार ला.सुनंदा भोसले, लायन्स क्लबच्या सचिव ला. नेहा व्होरा ,खजिनदार ला.विवेक गायकवाड, लायनेसच्या खजिनदार ला.मंगल घाडगे,डॉ.तुषार गायकवाड, जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव श्री.अनिल शिंदे, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. सुधीर अहिवळे , श्री.विकास काकडे , श्री.मोहनराव खलाटे, श्री.राजाभाऊ लोंढे-पाटील,ला.सुनीता कदम, ला. प्रितम लोंढे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments