ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
![]() |
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे निवेदन देताना संभाजी ब्रिगेड फलटणचे पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) 12 ऑक्टोबर 2020 - ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचेवर दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी देण्याबाबत गुन्हा नोंदवून त्यांचे विरूद कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड फलटण यांच्यावतीने करण्यात आली आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड फलटणच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आले या प्रसंगी संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे, प्रदीप घाडगे, दत्ता पवार, विनीत शिंदे, रणजित जांभळकर,बजरंग भगत,अजित शिंदे, सुबोध शिर्के,पंकज शिर्के,अजिंक्य कदम,विनोद जाधव,मराठा सेवा संघाचे नानासाहेब पवार,वैभव अभंग,जनमेजय कदम,सूरज भगत,प्रथमेष कदम,सौरभ कदम,अभिषेक कदम,सुरेश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड फलटण यांच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे मराठा समाजाच्या भावना तीव झालेल्या असताना, मराठा समाज व इतर जातींमध्ये दूही माजवून राज्यात दंगली घडविण्याच्या व अराजकता पसरवण्याच्या उद्देशाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपशब्द बोलून त्यांना अफजलखान संबोधून गंभीर अपराध केलेला आहे. दि .७/१०/२०२० रोजी अॅड . गुणरत्न सदावर्ते यांनी न्युज १८ लोकमत या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात जाहिरपणे वरील प्रक्षोभक विधाने करत आमच्यासह करोडो शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या असून, त्यामुळे राज्यातील जाती जातींमध्ये कलह निर्माण होवून दंगली भडकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे अॅड . गुणरत्न सदावर्ते यांचे विरूध्द दंगा घडवून आणण्यासाठी बोछुटपणे चिथावणी दिल्याबद्दल तसेच निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविण्यासाठी कृती केल्याबद्दल, वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करणारी विधाने केल्याबद्दल व तमाम भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपतींच्या गादीचा अपमान केल्याबद्दल गुन्ह्यांची नोंद करून, कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
No comments