Breaking News

कोरोना काळातही घरातील स्वच्छतेसाठी मेडिटॉल सोल्युशन ठरतंय प्रभावी


        फलटण (प्रतिनिधी) - सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मास्क घालणे, सॉनीटायझर वापरणे व सोशल डिस्टन्स ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. प्रामुख्याने कोरोना या आजाराचे व्हायरस जमिनीचा पृष्ठभाग व इतर वस्तुंच्या पृष्ठभागावर बराच काळ जिवंत राहत आहेत. व तो व्हायरस आपल्या हाताला लागल्यामुळे कदाचित आपणालाही चुकून कोरोना जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तो व्हायरस नष्ट होणे खूप गरजेचे आहे. आणि तो व्हायरस नष्ट करण्यासाठी मेडिको लॅब कंपनीचे मेडिटॉल लिक्विड हे खूप प्रभावी ठरत आहे असे फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी सांगितले आहे.

         मेडीटॉल लिक्विडचा प्रामुख्याने बहुउद्देशीय जंतुनाशक म्हणून मोठ मोठी हॉस्पिटल्स, शासकीय कार्यालय, ऑफिसेस, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग व घरातील जमिनीचे पृष्ठभाग, सर्व वस्तूंचे पृष्ठभाग त्याचबरोबर कपडे निर्जंतुकीकरण, फरशी निर्जंतुकीकरण, टॉयलेटचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तसेच विशेष करून आपणास झालेली जखम स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या लिक्विड चा वापर प्रभावी जंतुनाशक म्हणून करत आसतात. सदरचे लिक्विड हे अर्धा लिटर, १ लिटर, व ५ लिटरमध्ये उपलब्ध आहे.

        सर्व प्रकारच्या व्हायरस पासून संरक्षण देणारे व सर्वच वस्तू निर्जंतुकीकरण करणारे असे हे प्रभावी मेडीटॉल लिक्विडचा वापर आपण बहुउद्देशीय लिक्विड म्हणून होत असल्याचे सांगून नेवसे पुढे म्हणाले की, हे लिक्विड सध्या मे.वैषण्वी एजन्सीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे होलसेल दरात व रिटेल विक्री साठी फलटण मधील सर्व मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही मिलिंद नेवसे यांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधा. मो.नं. ९०२२९८२२२७

No comments