Breaking News

चोरीला गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादिस परत

 दागिने व रोख रक्कम फिर्यादी सागर मदनलाल करवा यांना परत देताना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बरडे 
        फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 10 ऑक्टोबर 2020 -  दि. 15 मार्च 2020 रोजी मारवाड पेठ फलटण येथून  सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने घराचा कडी कोंयडा तोडून घरात प्रवेश करून लंपास केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली. आज न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सदर गुन्ह्यात रिकव्हर करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला.

        फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 90/ 2020 भादविसं कलम 380, 454 ,457, 34 मधील फिर्यादी सागर मदनलाल करवा राहणार मारवाड पेठ फलटण तालुका फलटण यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपी यांनी दिनांक 15 मार्च 2020 रोजी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून, आत मध्ये प्रवेश करून सुमारे 1 लाख 72 हजार रूपये सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.  आरोपी 1. मुकेश माणिक जाधव 2.सुरज राजू जाधव यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी ताब्यात घेऊन, तपास कामी पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. आरोपींकडून काही मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला व काही मुद्देमाल पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यांनी जप्त केला होता. सदरचा जप्त मुद्देमाल जप्त  माननीय  न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्ह्यातील फिर्यादी अर्जदार श्री सागर मदनलाल करवा राहणार मारवाड पेठ फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा यांचे ताब्यात  उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बरडे सो व मा.पोलीस निरीक्षक पोमन यांच्या उपस्थित फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आला.


No comments