डॉक्टर महिला मृत्यू प्रकारणी दहिवडीमध्ये निवेदन - तपास पारदर्शक होण्यासाठी मीरा बोरवणकर किंवा प्रसन्ना यांची नियुक्ती करावी
दहिवडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - : डॉक्टर महिला मृत्यूप्रकारणी दहिवडी मध्ये विविध संघटनांनी सत्याग्रह अंदोलन करून,पारदर्शक तपास होण्यासाठी मीरा बोरवणकर किंवा के एम एम प्रसन्ना यांची नियुक्ती करावी या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार योगिता ढोले यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार , सूर्यभान जाधव , राज्य युवा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना ता . अध्यक्ष राजू मुळीक , शरद पवार गटाचे राज्य प्रवकत्ते प्रशांत वीरकर , स्वाभिमानीचे खटाव ता . अध्यक्ष दत्तू काका घार्गे , शरद खडे, डॉ प्रसाद ओंबांसे , महेश कर्चे , काँग्रेसचे खटाव ता . अध्यक्ष दादासाहेब भोसले , सदाशिव खाडे, इ. उपस्थित होते.
सदर प्रकरणामध्ये पारदर्शक व स्वच्छ कारभार होण्याकरिता मीरा बोरवणकर मॅडम निवृत्त महिला आयपिएस अधिकारी किंवा राष्ट्रीय सुरक्षा, के एम एम प्रसन्ना यांची नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणामध्ये संशयाची सुई माजी खासदार व त्यांचे दोन पीए यांच्याकडे जाते. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावे. सदर प्रकरणांमध्ये आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनातील आरोप झालेले अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. मयत डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून, सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे डॉ. संपदा मुंडे हयात असताना त्यांनी केलेल्या तक्रारी व चौकशी समितीला दिलेले उत्तर हे सुसाईड नोट म्हणून गृहीत धरण्यात यावे. डॉ संपदा मुंडे मृत्यूप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करून योग्य दिशेने चौकशी करून डॉक्टर कन्येला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल इशारा देण्यात आला आहे.

No comments