Breaking News

17 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

            सातारा दि. 13 -:  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 17 ऑक्टोबर पर्यंत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मनुष्य हानी टाळण्यासाठी सतर्कतेचा बाळगावा, असे राज्य शासनाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी कळविले आहे.

No comments