नव्या कृषी कायद्याला फलटण काँग्रेसचा विरोध
![]() |
नव्या कृषी कायद्याला विरोध करून केंद्र सरकारचा निषेध करताना महिंद्र सूर्यवंशी (बेडके), आमिरभाई शेख, पंकज पवार, शंकरराव लोखंडे, प्रीतम जगदाळे, अरुण खरात सोपान जाधव व इतर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाला विरोध दर्शवीत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून, धरणे आंदोलन करण्यात आले. निषेध व मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे नगरसेवक सचिन सुर्यवंशी बेडके,जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा समन्वयक महेंद्र सुर्यवंशी बेडके , राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते हेमंत जगताप, पंकज पवार, अमिरभाई शेख, अरुण खरात सर, प्रितम जगदाळे, शंकरराव लोखंडे, बार्शीकर अमित पोतेकर,सोपान जाधव,अभिलाष शिंदे उपस्थित होते.
फलटण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने तहसीलदार यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विषयी तीन नवीन वेगवेगळे कायदे संमत करून, शेतकऱ्यांचे हित जपत असल्याचे दर्शवले आहे. पण ते सर्व कायदे पूर्णपणे शेतकरीविरोधी आहेत. ते संमत केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होऊ होणार आहे. मुक्त बाजारपेठेत व्यापारी,दलाल, आडतदार मालाची साठेबाजी करून, मनमानीपणे भावाची चढ-उतार करून शेतकर्यांची पिळवणूक करू शकतात. त्यामुळे अशा शेतकरी विविध विरोधी कायद्याची अंमलबजावणी करू नये असे निवेदनात म्हटले आहे.
No comments