राजे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मेटकरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - राजे गटाचे माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुकाध्यक्ष शिवरुराजे खर्डेकर, अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, अमोल सस्ते उपस्थित होते.
आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी यांनी राजे गटाकडे नगर पालिका निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली होती, तसेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र उमेदवारी डावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मेटकरी यांच्यासोबत
रफीकभाई मेटकरी, ईकबाल मेटकरी, हाजी सादीकभाई मेटकरी, मजहर मेटकरी ,असलम मेटकरी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

No comments