पॉल मिल्ग्रोम व रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Paul Milgrom and Robert Wilson awarded the Nobel Prize in Economics
गंधवार्ता वृत्तसेवा (दि.12 ऑक्टोबर 2020) - अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील सुधारणांबद्दल आणि नवीन लिलावाच्या स्वरूपाच्या संशोधनासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी या पुरस्काराची घोषणा केली. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन हे अध्यापन आणि संशोधनाचे कार्य करत आहेत. लिलावाच्या प्रारुपात सुधारणेसाठी या दोघांनीही मोलाचे कार्य केले आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या पारंपारिक मार्गाने एखाद्या वस्तूची, सेवेची विक्री करणे कठीण असते. अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाबाबतच्या प्रारुपाची रचना केली असल्याचे रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.
No comments