वृत्तवाहिन्यांच्या विरोधात बॉलीवूड उच्च न्यायालयात
गंधवार्ता वृत्तसेवा (दि.12 ऑक्टोबर 2020) - वृत्त वाहिन्या आणि याबरोबरच सोशल मीडिया द्वारे बॉलिवूड बद्दल आक्षेपार्ह विधाने करून बेजबाबदार आणि अपमानजनक वार्तांकन केल्याप्रकरणी बॉलिवूडच्या एकत्र 4 फिल्म असोसिएशन आणि 34 चित्रपट निर्मात्यांनी चॅनल आणि त्यांच्या पत्रकारांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत बेजबाबदार आणि अपमानजनक टिप्पणी करण्यापासून संबंधित वृत्तवाहिन्यांना रोखण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. रिपब्लिक टीवी आणि याचे पत्रकार अर्नब गोस्वामी, प्रदीप भंडारी, चॅनल टाइम्स नाउ आणि याचे पत्रकार राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांना बॉलिवूडविरोधात बेजबाबदार वार्तांकन थांबवण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यांमध्ये
द प्रोड्यूसर गिल्ड ऑफ़ इंडिया
द सिने अँड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन
द फिल्म अँड टीवी प्रोड्यूसर्स काउंसिल
स्क्रीन-राइटर्स असोसिएशन
यशराज फिल्म्स
धर्मा प्रोडक्शंस
आमिर खान प्रोडक्शंस
सलमान खान वेंचर्स
सोहेल खान प्रोडक्शंस
रोहित शेट्टी पिक्चर्स
रेड चिलीज एंटरटेनमेंट
रिलायंस बिग एंटरटेनमेंट
राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट
कबीर खान फिल्म्स
अजय देवगन फिल्म्स
केप ऑफ गुड फिल्म्स
अरबाज खान प्रोडक्शंस
आशुतोष गोवारिकर प्रोडक्शंस
अनिल कपूर फिल्म एंड कम्युनिकेशन नेटवर्क
एक्सेल एंटरटेनमेंट
विनोद चोपड़ा फिल्म्स
विशाल भारद्वाज फिल्म्स
रॉय-कपूर प्रोडक्शंस
अॅड-लॅब्स फिल्म्स
आंदोलन फिल्म्स
बीएसके नेटवर्क एंड एंटरटेनमेंट
क्लीन स्लेट फिल्मज
एमी एंटरटेनमेंट एंड मोशन पिक्चर्स
फिल्म-क्राफ्ट प्रोडक्शंस
होप प्रोडक्शंस
लव फिल्म्स
मॅकगुफिन पिक्चर्स
वन इंडिया स्टोरीज
आर एस एंटरटेनमेंट
रियल लाइफ प्रोडक्शंस
सिखया एंटरटेनमेंट
टाइगर बेबी डिजिटल यांचा समावेश आहे.
No comments