Breaking News

कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी

 

  ७ हजार नवीन रुग्णांची नोंद तर त्याच्यादुप्पट रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचा रिकव्हरी रेट ८३.49 टक्क्यांवर (The cure rate of patients in the state is 83.49 percent )

राज्यात काल  ७ हजार ८९  नवीन कोरोना रुग्ण ; 165  मृत्यू (Corona virus Maharashtra updates :  today 165  died and 7 thousand 89 corona positive)

      मुंबई -: राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल  दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी  गेले.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

        आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख  २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

No comments