Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस कडून देशातील पहिल्या एल.जी.बी.टी. सेलची स्थापना

        गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 6 ऑक्टोबर 2020) -एल.जी.बी.टी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच तीनच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने  देशातील पहिल्या समलैंगिक समूह विभाग (एल.जी.बी.टी. सेल) ची काल स्थापना करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व व खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

        राष्ट्रवादी काँग्रेस कडून दि. ५-१०-२०२० रोजी दु १२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई येथे एल.जी.बी.टी. सेलची  स्थापना झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व व खा. सुप्रिया सुळे यांनी कार्यकारणी जाहीर केली, सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

        एल.जी.बी.टी समूहाला सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस  तर्फे एल.जी.बी.टी सेलची स्थापना करण्यात आली. एल.जी.बी.टी समूहासमोर शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकले आहे असे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी संगितले. 

        या सेलच्या माध्यमातून एल.जी.बी.टी समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य दिले जाईल. एल.जी.बी.टी समुहाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी सेलद्वारे कार्यक्रम आखण्यात आला आहे, येत्या काळात हा कार्यक्रम यशस्वी करू असेही  प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी संगितले. 

        राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला पक्ष आहे ज्याने युवती सेलची स्थापना केली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस समलैंगिक समूह विभाग स्थापन करणाराही देशातील पहिला पक्ष ठरलाय. आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत, म्हणून या सेलची स्थापन केली आहे असल्याचे  खा. सुप्रिया सुळे यांनी संगितले. 

        या सेलच्या  माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे. सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतही आगामी काळात पुढाकार घेणार असल्याचे  खा. सुप्रिया सुळे यांनी संगितले. 

        महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह १०-१२% आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र या सेलच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असा विश्वास सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.

No comments