Breaking News

नवोदय विद्यालय सातारा निवड चाचणी परीक्षा फॉर्म 30 नोव्हेंबर पर्यंत भरावेत

        Navodaya Vidyalaya Satara Selection Test Form should be filled up by 30th November

        दुधेबावी (गंधवार्ता वृत्तसेवा)  - जवाहर नवोदय विद्यालय सातारा निवड चाचणी परीक्षेचे फॉर्म  ३० नोव्हेंबर २०२० अखेर  ऑनलाईन भरावेत असे आवाहान जवाहर नवोदय विद्यालय सातारचे   प्राचार्य  आर.टी.लाड यांनी केले आहे. जवाहर नवोदय विद्यालय सातारा २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावी प्रवेशाकरिता निवड परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

        सातारा जिल्हयातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता पाचवी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिकत असावा. विद्यार्थी १ मे २००८ पूर्वी व ३० एप्रिल २०१२ नंतर जन्म झालेला नसावा.

        सन, २९१८-१९, २०१९-२०, २९२०-२१  मध्ये विद्यार्थी तिसरी, चौथी,पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहिजे.  अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतियपंथीय उमेदवार सुद्धा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी अर्ज करू शकतात. 

          जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पक्रियेतून सोपी केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा २०२१ साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल टॅबद्वारे आर्ज भरावेत .  वेबसाईट वरती लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी त्वरीत ऑनलाईन फाॅर्म भरावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य, आर.टी.लाड यांनी केले आहे. हे ऑनलाईन फाॅर्म भरणे मोफत असल्याचे प्राचार्य लाड यांनी स्पष्ट केले.

No comments