उत्तर कोरेगाव अतिवृष्टी झालेल्या भागाची आ. दीपक चव्हाण यांच्याकडून पाहणी
![]() |
अधिकाऱ्यांना सूचना देताना आ. दिपक चव्हाण |
गंधवार्ता वृत्तसेवा - फलटण-कोरेगाव मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या मौजे फडतरवाडी, विखळे,वाठार स्टेशन, दहिगाव, करंजखोप, चवणेश्वर येथील नुकसान ग्रस्त कामाची पाहणी करुन संबंधीत अधिकाऱ्यांना त्वरीत पंचनामे करुन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना आ. दिपक चव्हाण यांनी केल्या.
फलटण तालुक्यातील दौरा झाल्यानंतर आ. दिपक चवहन यांनी उत्तर कोरेगाव भागातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अहेतना स्वतः भेट देऊन संबंधित शेतकऱ्याची चर्चा करून सदर नुकसानीबाबत तहसील कार्यालयाला त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी आ.दिपक चव्हाण यांच्या समवेत कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे तालुका कृषी अधिकारी नागेश शेठ जाधव,मा.श्री.संजय साळुंखे-उपसभापती,प.स.कोरेगाव, मा.श्री.नागेशशेठ जाधव,तालुका कृषी अधिकारी शेळके साहेब,सा.बा.डेरे साहेब,जि.प.बांधकाम कुंभार साहेब,कृषी अधिकारी जगताप,संदीप धुमाळ, ऋषिकेश जाधव,धनंजय धुमाळ,दयाराम शेरे,विनायक चव्हाण,शिवाजीराव चव्हाण,मधुकर चव्हाण(मामा),गणेश थोरवे,सरपंच मतकर,शिवाजी अहिरेकर,राहुल धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते
![]() |
शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करताना आ. दिपक चव्हाण |
No comments