माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोना

Former Chief Minister Narayan Rane's Corona test positive
गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 1 ऑक्टोबर 2020) - राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कोरोंना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन'
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वेगवेगळ्या मिटींगला हजर राहिले होते. काल त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह निघाली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्लानुसार ते काही दिवस आयसोलेट राहणार आहेत, पुन्हा आपण रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments