राहुल गांधी यांना धक्काबुक्की!

कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस येथील घटनेच्या पिडीतांना भेटण्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी काँग्रेस नेत्यांसमवेत हाथरसच्या दिशेने जात असताना त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून केली गेलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर दिली आहे.
गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 1 ऑक्टोबर 2020) - हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांनी रोखले. त्यनातर ते चालत बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची क्लिप व्हायरल झाली असून यामध्ये, राहुल गांधी यांना पोलिसांकडून अडवणूक करत असताना ढकला ढकली करण्यात आल्याचे दिसत आहेल. दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली आहे. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला चालण्यसाठी परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो.
इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय!
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की,दुख की घड़ी में अपनों को अकेला नहीं छोड़ा जाता। UP में जंगलराज का ये आलम है कि शोक में डूबे एक परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है। इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय!
प्रियंका गांधी यांनीही ट्विटच्या माध्यमातून म्हणल्या की,
हाथरस जाने से हमें रोका। राहुल जी के साथ हम सब पैदल निकले तो बारबार हमें रोका गया, बर्बर ढंग से लाठियाँ चलाईं। कई कार्यकर्ता घायल हैं। मगर हमारा इरादा पक्का है। एक अहंकारी सरकार की लाठियाँ हमें रोक नहीं सकतीं। काश यही लाठियाँ, यही पुलिस हाथरस की दलित बेटी की रक्षा में खड़ी होती।
No comments