फलटण तालुक्यात 47 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

फलटण दि. 1 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 1 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 47 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 9 व्यक्ती तर ग्रामीण भागात 38 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावल्या आहेत. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 9 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये , शुक्रवार पेठ 3, मेटकरी गल्ली 1,गोळीबार मैदान 1 व फलटण असा पत्ता दिलेले 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 38 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये गुणवरे 8, अंदरुड 7, धुळदेव 3, निंभोरे 3, झिरपेवाडी 2, खटकेवाडी 1, वडले 2, तिरकडवाडी 1, चौधरवाडी 1, विडणी 1, मठाचीवाडी 1, जाधववाडी 1, साठेफाटा 1, धुमाळवाडी 1, साखरवाडी 1, फडतरवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
1 रुग्णाचा मृत्यू
बुधवार पेठ फलटण येथील 52 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments