मुंबईतील लाईट गेल्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जा मंत्री

गंधवार्ता वृत्तसेवा (14 ऑक्टोबर 2020) - मुंबईसह उपनगरात वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोशल माध्यमांद्वारे, मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही असे ट्वीट केले आहे.
मुंबई व उपनगरातील गेलेल्या विजेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले असतानाच आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घातपाताची शक्यता नाकारता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना ट्रोल केले जात आहे. यामध्ये कित्येक युजर्स यांनी ट्विटच्या विरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्स यांनी सपोर्ट देखील केला आहे.
मुंबईमध्ये काही ठिकाणी तीन तर उपनगरांमधील काही भागांमध्ये पाच तास वीजपुरवठा खंडित झालेला होता. यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला होता. मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाले होते.
No comments