वाढदिवस साजरा करणार नाही ; कोरोना काळात सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या - दिलीपसिंह भोसले

गंधवार्ता वृत्तसेवा (14 ऑक्टोबर 2020) - सद्गुरू संस्था समूह व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचा वाढदिवस १४ ऑक्टोबर रोजी असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय दिलीपसिंह भोसले यांनी घेतला आहे.
आज संपूर्ण जगावर कोरोना चे संकट आहे. गेले कित्येक महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटा विरुद्ध लढा देत आहोत.आणि लढा देत असताना आपल्या सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे. बुधवार,दिनांक १४ ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे.माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला शुभेच्छा आणि आशिर्वाद द्याव्यात अशी विनंती दिलीपसिंह भोसले यांनी केली आहे.
कोरोना व्हायरस चे वातावरण बदलल्यावर आपण नक्की भेटू, तोपर्यत प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया.आपण सर्वजण कोरोना पासून आपल्या आरोग्याची काळजी घ्या हिच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल.आपले प्रेम आणि आशिर्वाद सदैव माझ्या बरोबर राहुद्या. धन्यवाद!! असे आवाहन सद्गुरु व महाराजा उद्योग समूह समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे.
No comments