अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबियांना नगरसेवकांच्या वतीने अन्न वाटप
![]() |
नागरिकांच्या भोजनाची वाटप करताना आ.दीपक चव्हाण, नगरसेविका सौ. प्रगति कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, भाऊ कापसे |
फलटण : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर येथील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी केली, त्यावेळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना आ.दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते अन्नदान वाटप करण्यात आले, सदरचे अन्नदान नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या वतीने देण्यात आले, यावेळी पै.अभिजीत जानकर, श्री.गणेश धायगुडे, श्री.सनी पवार, श्री.दिपक शिंदे, श्री.राहुल जाधव, श्री.शशिकांत शिंदे, श्री.पप्पू कोरे व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
No comments