सातारा जिल्ह्यात 925 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 16 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 925 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 509 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
509 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 58, कराड येथील 18, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 95, वाई येथील 18, खंडाळा येथील 40, रायगाव येथील 45, पानमळेवाडी येथील 53, मायणी येथील 6, महाबळेश्वर येथील 10, पाटण येथील 40, दहिवडी येथील 8, तळमावले येथील 24, पिंपोडा येथील 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 79 असे एकूण 509 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 168785
एकूण बाधित -- 42969
घरी सोडण्यात आलेले -- 35699
मृत्यू -- 1415
उपचारार्थ रुग्ण -- 5855
No comments