सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर
राज्यात काल कोरोनाचे १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्याचा रिकव्हरी रेट 84.03 टक्क्यांवर (The cure rate of patients in the state is 84.03 percent )
राज्यात काल ८ हजार ५२२ नवीन कोरोना रुग्ण ; 187 मृत्यू (Corona virus Maharashtra updates : 187 died and 8 thousand 522 corona positive)
मुंबई -: राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. कालही सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
No comments