Breaking News

सातारा जिल्ह्यात 242 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

 

        सातारा दि. 13 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 242 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 471 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 471 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 64, कराड येथील 11, फलटण येथील 57, कोरेगाव येथील 67,  खंडाळा येथील 35, रायगाव येथील 30, पानमळेवाडी येथील 48, मायणी येथील 20, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 15, खावली येथील 9,  म्हसवड येथील 21, पिंपोडा 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 82 असे एकूण 471 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 164293

एकूण बाधित -- 42076

घरी सोडण्यात आलेले -- 34113

मृत्यू -- 1381

उपचारार्थ रुग्ण -- 6582


No comments