वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीर

Blood donation camp on Sunday on behalf of World Maratha Organization Group
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 17 ऑक्टोबर 2020) - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या वतीने रविवारी दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी सजाई गार्डन विंचुर्णी रोड, फलटण येथे सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असे म्हटले जाते. सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढ्यांमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन तसेच कोरोना महामारीच्या या भीषण कालखंडामध्ये आपणही योगदान दिले पाहिजे, हा सामाजिक लोकहिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा जिल्हा या ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दत्ता जगदाळे सर, ऑकार देशमुख सर ,गजानन चव्हाण (99754 15541), सुरज नलवडे 9665860707 सागर धुमाळ 9764433007 ऋषिकेश कदम 9730105375 सुनील यादव (8208380044), प्रकाश सस्ते 9421388666 अभिजित जाधव 7498303375 सचिन गायकवाड (9152791788), आशिष तावरे 9922937519 हे ग्रुप सदस्य नियोजन करत असल्याची माहिती वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मराठा प्रवीण पिसाळ सर यांनी दिली आहे.
No comments