कराड, कोरेगाव व वाई येथील सोयाबीन खरेदी केंद्रास मंजुरी

Approval for soybean procurement centers at Karad, Koregaon and Wai
सातारा -: हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करीता नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र कार्यान्वीत करण्याकरिता दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फेडरेशन लि. या खरेदी अभिकर्ता संस्थेस मंजुरी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील मंजुर सोयाबीन खरेदी केंद्र व उपअभिकर्ता संस्था पुढीलप्रमाणे. कराड तालुका खरेदी विक्री संघ कराड, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ कोरेगाव, वाई तालुका खरेदी विक्री संघ वाई.
शासकीय आधारभूत किंमत योजनेत सोयाबीन पिकाचा हमीभाव प्रति क्विंटल 3880/- आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंगअधिकारी सातारा यांनी केले आहे.
No comments