मंदिरे खुली करण्यासाठी कोळकी येथे भाजपाचे आंदोलन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) 13 ऑक्टोबर 2020 - भारतीय जनता पक्ष फलटणच्या वतीने आज कोळकी येथील मारुती मंदिर येथे मंदीरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार च्या धोरणांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. मंदीरे चालू झालीच पाहिजेत. नवरात्री उत्सवाला परवानगी मिळालीच पाहिजे. अशा घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज प्रदेश अध्यक्ष आ चंद्रकांत दादा पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या सुचनेनुसार गेली सहा महिन्यापासून मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता अनेक वेळा मागणी केली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरी ही महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही उलट राज्यात मदिराचे बार उघडण्यात आले. संतांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारने बार सुरू आणि मंदिरे बंद असे काळे चित्र उभे केले आहे या काळ या निर्णयाविरोधात मंदिरे तातडीने उघडावी यासाठी सर्व अध्यात्मिक संघटना,साधुसंत यांनी आज एक दिवसाचं उपोषण व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून मंदीर खुली करण्यासाठी फलटण भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मारूती मंदिर कोळकी येथे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार च्या धोरणांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. मंदीरे चालू झालीच पाहिजेत. नवरात्री उत्सवाला परवानगी मिळालीच पाहिजे. अशा घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, पै. बाळासाहेब काशिद, युवा नेते संदिप नेवसे, यशवंत जाधव, गणेश घाडगे, रणजीत जाधव, रामभाऊ शेंडे, पत्रकार राजेंद्र पोरे, राजेंद्र जगदाळे, प्रदीप भरते, गणेश वाकोडे, पार्थ पोरे, अभिजीत शिंदे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
No comments