Breaking News

वाह प्रशासन! बार आणि दारुची दुकाने उघडण्याची सूट मात्र मंदिरे धोक्याच्या झोनमध्ये - अमृता फडणवीस

        गंधवार्ता वृत्तसेवा ( दि. 14 ऑक्टोबर 2020 ) - मंदिरे खुली करण्याचा वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत, सरकारवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  सरकारवर टीका करत, महाराष्ट्रात बार व दारूची दुकाने सुरू ठेवण्यास सूट आहे मात्र मंदिरे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. ज्या लोकांना विश्वास नाही त्यांना प्रमाणपत्र देऊन स्वत: ला सिद्ध करावे लागते अशी टीका केली आहे.

        अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, वाह प्रशासन! महाराष्ट्रात बार आणि दारुची दुकाने उघडण्याची सूट आहे, मात्र मंदिर हे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते, असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) लागू करण्यात अपयशी ठरतात.

        कालच राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, मंदिर खुले करण्याबाबत व मुख्यमंत्री यांच्या धर्मनिरपेक्ष बाबत लिहिले होते, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना, माझ्या हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज  नसल्याचे प्रतिउत्तर दिले होते.

No comments