राज्यात दि. 18 पर्यंत जोरदार पाऊस : कुलाबा वेधशाळेचा अंदाज
गंधवार्ता वृत्तसेवा ( दि. 14 ऑक्टोबर 2020 ) - हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात येत्या 5 दिवस वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबई कुलाबा वेधशाळेने जारी केलेल्या पत्रकानुसार आज दि. 14 ऑक्टोबरपासून ते येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे
दि. 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मनुष्य हानी टाळण्यासाठी सतर्कतेचा बाळगावा, असे राज्य शासनाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी कळविले आहे.
परतीचा पाऊस महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले आहे, मुसळधार पावसाचा तडाखा शेतीला बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके देखील वाया गेली आहेत, यातच सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.



No comments