Breaking News

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर

संग्रहीत छायाचित्र

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि 7 ऑक्टोबर 2020) - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज सप्लाय  प्रकरणात कोठडीत असलेल्या   अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज उच्च न्यायालयाने तिच्या अर्जावर सुनावणी करून तिला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान  तिचा भाऊ शौविक यास मात्र जामीन नाकरण्यात आला आहे.   

       उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात निकाल राखून ठेवला होता. तर सत्र न्यायालयाने काल मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ केली होती.  सत्र न्यायालयाकडून  रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळण्यात आला होता, त्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती.   

No comments