Breaking News

बालकाच्या खून प्रकरणी आरोपीला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी; आरोपीचे वकीलपत्र नाहीच

            
        गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 7 ऑक्टोबर 2020) -  10 महिन्यांच्या बालकाच्या खून प्रकरणात संशयित आरोपी लोखंडे  यास फलटण न्यायालयापुढे हजर केले असता.  न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आजही आरोपीतर्फे कोणाचेही वकीलपत्र दाखल झाले नाही.

        काळज ता. फलटण येथून अपहरण करून ओंकार  भगत या 10 महिन्याच्या बालकाचा खून  करण्यात आला होता. सदरचा खून हा एकतर्फी प्रेमातून चिडून जाऊन करण्यात आला. या प्रकरणात तडवळे येथील लोखंडे यास पोलीसांनी ताब्यात घेऊन दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी आरोपीला न्यायालयापुढे हजर करून, सदर गुन्ह्यात तपास प्रगतीपथावर असून आणखी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे.

         दरम्यान माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून, सदर गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय फलटण वकील संघाने घेतला होता. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दुसऱ्यांदा न्यायालयापुढे हजर केल्यानंतरही आरोपीचे वकीलपत्र दाखल झाले नाही. 

No comments