Breaking News

सातारा जिल्ह्यात 385 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

        सातारा दि. 14 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 385 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 594 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

594 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54, कराड येथील 16, फलटण येथील 19, कोरेगाव येथील 50,  खंडाळा येथील 55, रायगाव येथील 82, पानमळेवाडी येथील 132, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 10, पाटण 9, खावली येथील  33, तळमावले 21,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 56 असे एकूण 594 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 165929

एकूण बाधित -- 42430

घरी सोडण्यात आलेले -- 34498

मृत्यू -- 1399

उपचारार्थ रुग्ण -- 6533

No comments