Breaking News

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

 

      Shri Vitthal Rukmini Temple closed till September 30
  फलटण दि 1 सप्टेंबर 2020 (गंधवार्ता वृत्तसेवा) - मागील काही दिवसापासून मंदिरे खुली करण्याबाबत वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलने केली असतानाच, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर,  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी  30 सप्टेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, मंदिर व्यवस्थापन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

        प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने, महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिनांक 17 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले होते.
        तथापि राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2020  रोजी संपूर्ण राज्यात लॉक डाऊन वाढवून, सर्व धार्मिक स्थळे दि.  30 सप्टेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, मात्र श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यात येत आहेत, तसेच इतर सन, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत.

        सदरचे पत्रक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे सर्व सदस्य महोदय यांच्याशी विचार विनिमय करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.




No comments