सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

Big increase in gold-silver prices
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३२९ रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सोन्याचे दर ५१ हजार ५७५ रूपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. तर दुसरीकडे २२ कॅरेट सोन्याचे दर ४८ हजार ६६० रूपये प्रति दहा ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचे दर ३९ हजार ७८० रूपये प्रति १० ग्रॅम इतके झाले.
तर दिल्लीतही २४ कॅरेट सोनाच्या दरात ४१८ रूपयांची वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर दिल्लीत सोन्याचे दर ५२ हजार ९६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. सोन्यासोबतच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी चांदीच्या दरात २ हाजर २४६ रूपयांची वाढ होऊन ती ७२ हजार ७९३ प्रति किलोवर पोहोचली आहे. सोमवारी सोन्याचे दर ५२ हजार ५४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७० हजाप ५४७ रूपये प्रति किलोवर बंद झाली होती.
No comments