अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान एनसीबी कार्यालयात हजर

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 26 सप्टेंबर 2020) - अभिनेत्री दीपिका पदुकोण ड्रग्ज प्रकरणात आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिल्यानंतर नंतर श्रद्धा कपूर आणि आता सारा अली खान एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत चित्रपट क्षेत्रातील ड्रग्स प्रकरण पुढे आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावनी करून चौकशीस हजर राहण्यास कळवले होते. त्याप्रमाणे आज दीपिका व श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली आहे आणि आता सारा अली खान ची चौकशी सुरू आहे.
![]() |
श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात हजर होताना |
अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्सची बजावनी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काल २५ सप्टेंबर रोजी रकुल प्रीतची चौकशी झाली असून आज २६ सप्टेंबर दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर व सारा अली खानची चौकशी होत आहे. आता सारा, दीपिका आणि श्रद्धा यांच्या चौकशीतून कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
No comments